कॉर्पोरेट सेक्टरने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याची गरज - नितीन गडकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
मुंबई : कॉर्पोरेट सेक्टरने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याची गरज असून अशी गुंतवणूक वाढल्यास समाजातील सर्वसामान्य माणसाला त्याच्या गावात आरोग्य सेवा आणि सुविधांची उपलब्धता होऊ शकेल असे मत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. कॉलेज ऑफ फिजिशिएन ॲण्ड सर्जनस् मुंबईच्या १४३ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. 
 
 
 
 
वैद्यकीय शिक्षण सार्वत्रिक होण्याची जेवढी गरज आहे तेवढीच त्याची गुणवत्ता जपण्याची देखील गरज आहे, त्यात तडजोड होता कामा नये. जीवनात पैसा महत्वाचा आहेच परंतू ते साधन होऊ शकते अंतिम साध्य नाही, त्यामुळे ज्या समाजाने आपल्याला मोठे केले त्या समाजाचे ऋण फेडण्याची, सामाजिक संवेदनशीलता जपण्याची संधी डॉक्टरांना मिळत असते त्याची जपणूक त्यांच्याकडून व्हावी असे ते यावेळी म्हणाले. 
 
 
 
 
शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण हे देशाच्या भविष्यासाठी महत्वाचे असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की, शिक्षणातून केवळ रोजगार मिळत नाही तर नागरिकाचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण होते. यातूनच आदर्श समाजाकडे त्याची वाटचाल सुरु होते. नीट सारख्या परिक्षांमुळे वैद्यकीय शिक्षण गुंणवत्तापूर्ण होण्यास मदत झाली आहे. केंद्र सरकारने १० कोटी परिवारांना वैद्यकीय विम्याच्या छत्राखाली आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय धेतला आहे. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या ११५ जिल्ह्याची निवड केंद्र सरकारने केली असून त्या जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे ठरवले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील जिल्हा रुग्णालये टाटा ट्रस्ट सारख्या नामांकित चॅरिटबेल ट्रस्टना काही कालावधीसाठी चालवण्यासाठी देता येतील का, याचा अभ्यास अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी करावा असे आवाहन ही त्यांनी याप्रसंगी केले.
 
@@AUTHORINFO_V1@@