पुलवामामध्ये माजी कॉंग्रेस नेत्यांची दहशतवाद्यांकडून हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |



पुलवामा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यामध्ये एका माजी कॉंग्रेस नेत्याची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गुलमान नबी पटेल असे या काँग्रेस नेत्याचे नाव असून पाच ते सहा दहशतवाद्यांनी आज त्यांची हत्या केली आहे. त्यामुळे पुलवामामध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून या दहशतवाद्यांच्या शोधसाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

पुलवामामधील राजपोरा येथे आज दुपारी ही घटना घडली. दुपारी पटेल हे आपल्या गाडीमधून दोन अंगरक्षकांसह एका ठिकाणी जात असताना वाटेत अचानक काही दहशतवाद्यांनी त्यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत असताना त्यांचे दोन अंगरक्षक इम्तियाज अहमद जरगर आणि बिलाल अहमद मीर हे दोघेही गंभीररीत्या जखमी झाले. यानंतर दहशतवाद्यांनी पटेल यांना लक्ष करत, त्यांच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये पटेल मध्ये जागीच मृत्यु झाला व त्यानंतर दहशतवाद्यांनी येथून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच या अंगरक्षकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. दहशतवाद्यांकडून हा भ्याड हल्ला केला गेला असल्याचे त्यांनी म्हटले असून पटेल यांच्या कुटुंबियांप्रती साहनभुति देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@