शेतीत करिअर करणे म्हणजे एकप्रकारची देशसेवाच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |

अथांग जैन यांचे प्रतिपादन; फाली संमेलनाचा समारोप, विजेत्यांना पारितोषिक वितरण


 
जळगाव :
शेतीची प्रगती साधणे ही एकप्रकारे देशसेवाच आहे. भारताच्या सुरक्षेसाठी अन्नसुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज शेतीतूनच भागविली जाईल, असे प्रतिपादन जैन फार्मफ्रेशचे संचालक अथांग जैन यांनी केले.
जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि. व नॅन्सी बेरी फउंडेशन ‘क्शन प्लॅटफार्म’तर्फे आयोजित भारताच्या कृषी क्षेत्रातील भविष्यदर्शी नायकांच्या फाली-२०१८ संमेलनाचा समारोप झाला. याप्रसंगी जैन बोलत होते.
 
 
गांधी रिसर्च फाउंडेशनच्या कस्तुरबा सभागृहात झालेल्या समारोप कार्यक्रमास व्यासपीठावर डॉ. डी. एन. कुळकर्णी, फाली फाउंडेशनच्या समन्वयिका नॅन्सी बेरी, गोदरेज कंपनीचे व्यवस्थापक डॉ. संजय टोके, युपीएलचे व्यवस्थापक नथा डोडीया, स्टार ग्रीचे विष्णु गुप्ता, बायरचे प्रितम, रयत शिक्षण संस्थेचे कमलाकर महामुनी, विलास मंडलिक, दिव्या बारमनी, बालाजी हाके, अलिबिया मुजूमदार, विरेन ब्रह्मा उपस्थित होते.
 
 
अथांग जैन म्हणाले की, अधिक अन्नधान्यासाठी तिसर्‍या हरितक्रांतीची नांदी ठरू पाहत आहे. फाली संमेलनात सहभागी झालेले विद्यार्थी भविष्यातील कृषी क्षेत्राचे नायक आहेत. या उपक्रमातून निश्चितपणे ते काहीतरी शिकतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
 
 
फालीच्या दुसर्‍या टप्प्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी शेतकर्‍यांशी सुसंवाद साधला.
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शेतीविषयी मनात सकारात्मकता आणि शाश्वत तंत्रज्ञानाची कास प्रत्येकाने धरली पाहिजे. असा सूर चर्चेत उमटला. सुत्रसंचलन रोहिणी घाडगे यांनी केले.
फाली इनोव्हेटीव्ह स्पर्धेतील विजेते
प्रथम : न्यू इंग्लिश हायस्कूल, वरूड (अमरावती), द्वितीय छत्रपती शिवाजी विद्यालय (नाशिक), तृतीय कर्मवीर भाऊसाहेब पाटील विद्यालय, चतुर्थ महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (आस्था) तर पाचवा क्रमांक जे. बी. गर्ल्स हायस्कूल (अमरावती) यांनी पटकाविला.
 
 
बिझनेस प्लॅन स्पर्धेतील विजेते
प्रथम : महाराजा सयाजीराव विद्यालय (सातारा), व्दितीय श्रीमती अनुसयाबाई भालेराव विद्यालय (नाशिक), तृतीय अरूध विद्यालय (नाशिक), चतुर्थ हिरकणी विद्यालय गावडेवाडी (पुणे) तर पाचवा क्रमांक महात्मा गांधी हायर सेकंडरी स्कूल (आस्था) यांनी पटकाविला.
@@AUTHORINFO_V1@@