बलात्कार प्रकरणी आसाराम बापू दोषी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
जोधपुर : वादग्रस्त अध्यात्मिक गुरु आसाराम बापू यांच्या विरोधात बलात्कार प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून या निकालात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापू दोषी आढळून आले आहेत. या प्रकरणात अजून दोन व्यक्तींचा हात होता त्यांना देखील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. आसाराम बापू यांच्या शिक्षेवर आता चर्चा करण्यात येत आहे.
 
 
जोधपुर मध्यवर्ती कारागृहात या निकालाची आज सुनावणी केली गेली असून जोधपुरमध्ये तसेच आसपासच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तात ही सुनावणी पार पडली आहे. आसाराम बापूंच्या प्रकरणावर सुनावणीसाठी न्यायाधीश जोधपुर मध्यवर्ती कारागृहात पोहोचले होते. सुनावणी होणार म्हणून जोधपुरमधील रेल्वे स्थानक, बस, सार्वजनिक ठिकाण या सगळ्या ठिकाणी पोलिसाकडून आज कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
 
 
 
आसाराम बापूंच्या आश्रमात शिकत असलेल्या मुलीवर आसाराम यांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात बापूंना अटक करण्यात आली होती. अत्याचारीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून बापूंना अटक ऑगस्ट २०१३ मध्ये झाली होती. आता याच प्रकरणाचा निकाल आज सुनावण्यात आला आहे. बापूंचे समर्थक न्यायालयाबाहेर विरोध प्रदर्शन करू शकतात यामुळे आसाराम यांच्यावरील सुनावणी ही जोधपुर मध्यवर्ती कारागृहात केली गेली. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@