ज्ञानाचा फायदा रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी करा- सुधीर मुनगंटीवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
मुंबई : पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या डॉक्टरांनी आपल्या ज्ञानाचा फायदा रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी करावा असे आवाहन करून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सीपीएस मधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. आपल्या ज्ञानातून समाज सेवेचा नॅशनल हायवे बांधण्याचे आवाहन करून ते म्हणाले की, डॉक्टर होणं हे खरच जबाबदारीचे काम आहे. इतर सर्व गोष्टी या मानवनिर्मित असतात त्यामुळे त्यांची दुरुस्ती करणे शक्य होते. परंतू देवाने निर्माण केलेल्या मनुष्याला रोगमुक्त ठेवण्याचे काम डॉक्टर करतात त्यामुळे त्यांना देवदूत म्हटले जाते, देवाचा अंश मानले जाते. 
 
 
 
ग्रामीण भागात सीपीएसमधून पदव्युत्तर शिक्षण घेऊन काम करणाऱ्या डॉक्टरांचे योगदान मोठे आहे असे सांगून सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, एमबीबीएसनंतर उच्च शिक्षण घेण्याची संधी सीपीएसने दिली. राज्य आणि देशातील आरोग्य सेवा योग्यपद्धतीने हाताळली तर मेडिकल टुरिझमची मोठी शक्ती भारतात आणि महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
 
 
 
कार्यक्रमामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखानिहाय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पदव्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये २०० हून अधिक विद्यार्थी- विद्यार्थिनींचा समावेश होता. 
 
@@AUTHORINFO_V1@@