गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारसाठी २ कोटी रुपयांचा निधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |


जळगाव :
राज्यात शाश्वत सिंचन वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातर्ंगत जळगाव जिल्ह्याला २ कोटी १६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
 
 
जिल्ह्यातील अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर आणि पारोळा या तालुक्यांना प्रत्येकी २० लाख रुपये, जळगाव, धरणगाव, बोदवड, मुक्ताईनगर, भडगाव, भुसावळ आणि एरंडोल या तालुक्यांना प्रत्येकी १० लाख रुपये तर चोपडा, रावेर, यावल या तालुक्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी पाटील यांनी दिली.
जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारच्या माध्यमातून जिल्ह्यात शाश्वत सिंचन वाढण्यासाठी या अभियानातर्ंगत सुरु असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी सर्व यंत्रणांच्या अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी कृषी विभागातर्फे जलयुक्त शिवार अभियानातील कामांचे सादरीकरण करण्यात आले.
 
सचिवांकडून शनिवारी कामांची होणार पाहणी
जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले हे शनिवार, २८ एप्रिल रोजी सकाळी या योजनांचा आढावा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात घेतील. त्यानंतर ते जामनेर तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियानातील कामांची पाहणी करणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@