जलयुक्त शिवार : ८ कंत्राटदार काळया यादीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
भंडारा : जलयुक्त शिवार सन २०१६-१७ व २०१७-१८ अंतर्गत कामे सुरु न करणाऱ्या जिल्हयातील ८ कंत्राटदार, मजूर संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंताना काळया यादीत टाकण्यात आले आहे. या कंत्राटदार, मजूर संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंताची नोंदणी रद्द करुन त्यांना शासनाचे कुठलेही काम देवू नये अशी शिफारस जलयुक्त शिवार जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केली आहे.
 
जलयुक्त शिवार अभियान २०१६-१७ व २०१७-१८ अंतर्गत कृषि विभागाने प्रस्तावित कामांची ई-निविदा व वाटप प्रक्रियेचा अवलंब करुन मजूर सहकारी संस्था, सुशिक्षीत बेरोजगार अभियंता व खुली निविदेद्वारे कामांचे वाटप करण्यात आले. ई-निविदा व वाटप प्रक्रियेतील अटी व शर्तीनुसार संबंधित कंत्राटदारास तसेच मजूर संस्थेस कामांचे कार्यारंभ आदेश देवून सुध्दा कामे सुरु केलेली नाहीत. त्यामुळे वेळेत कामे पूर्ण होवू शकली नाही व विभागास प्राप्त विशेष निधी, डी.पी.डीसी निधी समर्पित करावा लागला. या संदर्भात ६ एप्रिल २०१८ रोजी जलयुक्त शिवार जिल्हास्तरीय समितीच्या सभेमध्ये सर्वानुमते कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार संघटना तसेच मजूर संस्थांना काळया यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@