राज्यातील रस्ते निर्मितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2018
Total Views |

चंद्रकांत दादा पाटील यांचे आवाहन


 
 
मुंबई : राज्यातील रस्ते निर्मितीमध्ये जगातील रस्ते निर्मितीमध्ये होणा-या आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि साहित्याचा अभ्यास करून वापर सुरू करावा, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले. तसेच यामुळे रस्त्यांच्या दुरूस्तीवरील खर्च कमी होऊन तो निधी इतर विकास कामांसाठी वापरता येऊ शकतो, असेही ते म्हणाले.
 
युनायटेड स्टेट ट्रेड डेव्हपलमेट एजन्सीच्या वतीने राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग व ऊर्जा विभागातील अधिकाऱ्यांसाठी आयोजित सार्वजनिक खरेदी प्रक्रियेमध्ये मूल्य निश्चिती या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अमेरिकेचे वाणिज्यदूत एडगर्ड कगन, युनायटेड स्टेट ट्रेड डेव्हपलमेट एजन्सीचे जागतिक कार्यक्रम संचालक अँड्री लुपो, दक्षिण आशियाचे प्रतिनिधी मेहनाज अन्सारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह उपस्थित होते. सरकारी खरेदी करताना मूल्यात्मक दर्जा असलेल्या वस्तूंची खरेदी कोणत्या प्रकारे करता येईल, यासाठी या कार्यशाळेचा उपयोग होणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे रस्ते निर्मिती करताना त्याचा दर्जा उत्तम रहावा, यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खरेदी प्रक्रियेमध्ये सुधारणा करून आणखी पारदर्शकता आणण्यात येणार आहे. याबरोबरच अधिकाऱ्यांनीही रस्ते बांधताना स्वतःच्या नव्या कल्पना राबवाव्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 
@@AUTHORINFO_V1@@