मुंबईत पाणीकपात नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2018
Total Views |

तलावांमध्ये जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

 


 
मुंबई : उन्हाळ्यामध्ये अनेक शहरांत पाणीकपात केली जात आहे परंतु मुंबईत पाणी कपात केली जाणार नाही. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये ३३ टक्के पाणी शिल्लक असून जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणी साठा शिल्लक असून मुंबईत पाणी पुरवठा जैसे थे च राहणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
 
मुंबईला वर्षभरासाठी एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. या पाण्याचा पुरवठा अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी या तलावांमधून केला जातो. मुंबईला दररोज ४५०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. मात्र प्रत्यक्षात सातही तलावांमधून ३८०० दशलक्ष लिटर पाणी आणले जाते. यामधील ३७५० दशलक्ष लिटर पाणी मुंबईसाठी तर उर्वरित लिटर पाणी ठाणे, भिवंडी आणि निजामपूरला पुरवले जाते. गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्याआधी ५ टक्क्यांपासून २० टक्क्यांपर्यंत पाणीकपात करावी लागत आहे. मात्र यावर्षी उपलब्ध पाणीसाठा पुरेसा असल्यामुळे पाणीकपातीची गरज भासणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 
मुंबईला सध्या रोज ३८०० एमएलडी पाणीपुरवठा होत असून पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याचवेळी ४ लाख ९० हजार एमएलडी इतका पाणीसाठा शिल्लक होता, तर यावर्षी ४ लाख ८० हजार एमएलडी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा अजून तीन महिने पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईत सध्यातरी पाणीकपात केली जाणार नाही.
 
@@AUTHORINFO_V1@@