'दहशतवाद्यांच्या पालनकर्त्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2018
Total Views |

स्वराज यांचा एससीओच्या बैठकीत पुनरुच्चार




बीजिंग :
'दहशतवाद हा जगासमोर एक मोठे आवाहन म्हणून उभा आहे. परंतु फक्त दहशतवादी गट नष्ट करून दहशतवाद नष्ट होणार नाही, तर दहशतवाद्यांचे पालनपोषण करणाऱ्या त्यांच्या पालक देशांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे स्पष्ट मत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले आहे. बीजिंगमध्ये आयोजित शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या प्रतिनिधी देशांच्या बैठकीत आज त्या बोलत होत्या.

आपल्या वक्तव्यामध्ये स्वराज यांनी दहशतवाद आणि त्याचे पालनपोषण करणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली. दहशतवाद कोणत्याही सीमेमध्ये बांधला गेलेला नाही. त्यामुळे तो जागतिक शांततेला धोका पोहचवत आहे. आज जगातील विविध भागांमध्ये या दहशतवादी गटांकडून सातत्याने हल्ले केले जात आहेत. त्यामुळे मानवी जीवनाच्या रक्षणासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन कारवाई केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. तसेच फक्त दहशतवादी गटांवरच नव्हे, तर त्यांचे पालनपोषण करणाऱ्या देशांवर देखील कठोर कारवाई केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

 
याचबरोबर जागतिक वातावरण बदल (क्लायमेट चेंज), पर्यावरण, व्यापार आणि मानवाधिकार या विविध विषयांवर देखील त्यांनी आपले मत मांडले 

 
 
एससीओ बैठक आणि चीन नेत्यांची द्विपक्षीय चर्चा या दोन उद्देशांसाठी गेल्या रविवारपासून स्वराज या चीन दौऱ्यावर गेल्या आहेत. आपल्या या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली होती व या बैठकीत सीमावादावरील भारताची भूमिका त्यांनी मांडली होती. जागतिक शांततेसाठी दोन्ही देशांमधील संबंध स्थिर राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले होते. दरम्यान भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण या देखील भारताच्या या भूमिकेवर दृढ असून एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी त्या देखील चीनमध्ये दाखल झाल्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@