पेट्रोल दरवाढ रोखणे कोणाच्याही हातात नाही : खा.संभाजी भोसले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2018
Total Views |

किल्ले रामशेज देखरेखीसाठी शिवकार्य संस्थेला दत्तक द्यावा,
खा. छत्रपतींकडे मागणी
 

 
नाशिक : ’’सध्या होत असलेली पेट्रोल दरवाढ कोणीही रोखू शकत नसून ती थांबविणे कोणाच्याही हातात नाही. या दरवाढीवर मी काय बोलणार? उलट पुढील राज्यसभा अधिवेशनात चांगल्याप्रकारे कामकाज झाले तर मी नक्कीच हा प्रश्न विचारणार आहे,’’ असे मत खासदार संभाजी भोसले यांनी व्यक्त केले.
 
 
रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, खासदार, छत्रपती संभाजी महाराज यांनी आज रामशेज किल्ल्याला भेट देऊन त्याची पाहणी केली. यावेळी किल्ले रामशेज देखरेखीसाठी शिवकार्य संस्थेला दत्तक द्यावा, अशी मागणी उपस्थितांनी खा. छत्रपतींकडे मागणी केली. त्या प्रसंगी त्यांनी आपले मनोगत मांडले. छत्रपती संभाजीराजेंच्या काळात घडलेल्या घटनांच्या आधारे या किल्ल्याला मोठा इतिहास आहे. यावेळी पायथ्याशी असलेल्या गावातील लोकांसह नाशिककरांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. खासदार भोसले यांनी एका दमात संपूर्ण किल्ल्याची चढाई केली. यावेळी पूर्ण किल्ल्याची पाहणी केली. त्याचा इतिहास समजून घेतला. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज असून रामशेज किल्ल्यावर येणारे छत्रपतींचे पहिलेच वंशज ठरले आहेत.
 
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची ५९ वी प्राचीन बारव संवर्धन मोहीम सोनगाव येथे झाली. श्रमातून भग्न, कचर्‍यात खितपत पडलेल्या बारवेचे रूपच बदलले. बारवेचा परिसर व आतील पाण्यापर्यंतचा भाग पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला. ’’प्राचीन बारव, जुन्या विहिरी, झरे या गावाचा जिवंत जलस्त्रोत व इतिहास आहे, तो जपा,’’ असे कळकळीचे आवाहन यावेळी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ यांनी केले.
 
रायगड विकास प्राधिकरणांतर्गत राज्यातील ४७ किल्ले समाविष्ट केले जाणार असून राज्य सरकार आणि केंद्रात तसा बैठकीत निर्णय घेतला असून यावेळी मुख्यमंत्रीदेखील उपस्थित होते. ६०० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे, असे खा. संभाजी भोसले यांनी स्पष्ट केले.
 
@@AUTHORINFO_V1@@