कोरेगाव भीमा प्रकरणात माओवाद्यांचा हात : सत्यशोधन समिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2018
Total Views |

 कोरेगाव भीमा हिंसाचार हा पूर्वनियोजित माओवादी कट असल्याचा आरोप


 
 
 
पुणे : संपूर्ण महाराष्ट्रातील जातीय वातावरण गढूळ करणाऱ्या कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात माओवाद्यांचा हात होता असा आरोप सत्यशोधन समितीने केला आहे. कोरेगाव भीमा हिंसाचारातील सत्य शोधून काढण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीचा अहवाल आज सादर करण्यात आला. पुण्यातील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार प्रदीप दादा रावत यांनी ही माहिती दिली आहे. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेला हिंसाचार हा माओवादी विचारांच्या संघटना आणि खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गट यांचा पूर्वनियोजित कट होता अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
 
 
 
 
दहशतवाद विरोधी पथकाने जानेवारी महिन्यात अटक केलेल्या काही संशयित माओवादी १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे गेले असल्याचे व ते काही वर्षांपासून एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे आणि हर्षाली पोतदार यांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे एल्गार परिषदेचे व कोरेगाव भीमा हिंसाचाराचे लागेबांधे काय आहेत याचा सखोल तपास राज्य सरकारने करावा अशी मागणी रावत यांनी यावेळी केली.
सत्यशोधन समिती -

कोरेगाव भीमाच्या घटनेच्या सत्यतेचा शोध घेण्याकरिता व हे सत्य प्रामाणिकपणे, पुराव्यांच्या आधारे समाजासमोर मांडण्याकरिता राष्ट्र सुरक्षा, सामाजिक क्षेत्रात काम करणारे अभ्यासक, कार्यकर्ते, वकील, प्राध्यापक अशा व्यक्तींनी एकत्र येऊन कोरेगाव भीमा हिंसाचार - १ जानेवारी २०१८, सत्यशोधन समिती स्थापन केली.  यामध्ये माजी लष्करी अधिकारी कॅप्टन स्मिता गायकवाड, लोकशाही जागर मंचाचे समन्वयक सागर शिंदे, मातंग क्रांती सेना महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रा. सुभाष खिलारे, नागपूर येथील मराठा युवा संघाचे दत्ता शिर्के, पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पवार व पुणे बार असोसिएशनचे माजी सदस्य अॅड. सत्यजित तुपे यांचा समावेश आहे.
 
या सगळ्या अहवालाचा अभ्यास केला असता लोकशाही व्यवस्थेला उलथवून लावण्याची मानसिकता तयार करण्याचे काम काही फुटीरतावादी, संशयित माओवादी विचारांचे गट करीत असून अशा गटांवर सरकारने योग्य कारवाई न केल्यास भीमा कोरेगाव हिंसाचारासारख्या घटना पुन्हा घडू शकतात. यामुळे सरकार, प्रशासन आणि समाजाने सतर्क राहण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी यावेळी म्हटले.
 
 
कोरेगाव भीमा हिंसाचार हा पूर्वनियोजित कट -
 
कोरेगाव भीमा येथील १ जानेवारी २०१८ या दिवशी व त्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराला ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवार वाड्यावर घेतलेली एल्गार परिषद जबाबदार आहे असा आरोप सत्यसोधन समितीच्या अहवालात करण्यात आला आहे. केवळ एवढेच नाही तर या हिंसाचारासाठी माओवादी अनेक महिन्यांपासून तयारी करत होते असेही अहवालात म्हटले आहे. त्यामुळे एल्गार परिषद आयोजित करण्यात पुढाकार घेतलेले कबीर कला मंचरिपब्लिकन पँथर या संशयित माओवादी गटांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सत्यशोधन समितीने केली आहे. 
 
 
या  हिंसाचाराचा घटनाक्रम पाहता २८ डिसेंबर २०१७ रोजी वढू बुद्रुक येथे रात्री ग्रामपंचायतीची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे वादग्रस्त व खोटा इतिहास असणारा फलक लावण्यावरून निर्माण झालेला वाद मुख्य निमित्त ठरते. हा फलक हिंदुत्त्ववादी गटांनी लावलेला नसून फलक लावणारे गावाबाहेरील लोक व संघटना कोणत्या, त्यांचे जातीवादी फुटीरतावादी व जहाल विचारांच्या गटांसोबत लागेबांधे आहेत का याचा सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
 
 

बामसेफच्या चौकशीची मागणी :

वढू बुद्रुक ग्रामपंचायतीने ३० डिसेंबर २०१७ रोजी पोलिसांना दिलेल्या पत्रकात बामसेफभारत मुक्ती मोर्चा या संघटनांचा उल्लेख करुन पुढे संभाजी महाराज समाधिस्थळ इजा व नुकसान तसेच विटंबना करण्याची दाट शक्यता आहे असे म्हटले आहे. तसेच बामसेफशी संबंधित प्रा. विलास खरात यांच्या '१ जानेवारी १८१८ स्वातंत्र्याचे बंड' या पुस्तकात "महाराष्ट्रात ब्राह्मणविरोधी दंगली उसळतील" असे प्रक्षोभक लिखाण असल्याने बामसेफची देखील सखोल चौकशी करण्याची मागणी सत्यशोधन समितीने केली आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@