'करारातून बाहेर पडाल तर याद राखा' : इराण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2018
Total Views |

तेहरान : 'इराण आणि अमेरिका यांच्यात झालेल्या अणु करारामधून अमेरिकेने माघार घेतल्यास त्याच्या गंभीर परिणामांना अमेरिकेला सामोरे जावे लागेल' असा थेट धमकी वजा इशारा इराणने दिला आहे. इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी हा इशारा दिला असून अमेरिका आणि फ्रान्सच्या प्रत्येक खेळीला उत्तर देण्यास इराण सज्ज असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
इराणमधील एका सभेमध्ये भाषण करत असताना रुहानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी रुहानी यांच्या या भाषणाचे इराणच्या काही प्रसारमध्यमांनी प्रक्षेपण देखील केले होते. 'अमेरिका जर आपल्याला शब्दांशी आणि वचनांशी एकनिष्ठ राहत नसेल, तर त्यावर काय कारवाई केली जाऊ शकते, हे इराणला माहित आहे. परंतु आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन केल्याचे काय परिणाम भोगाव लागतात हे मात्र ट्रम्प यांना माहित नाही' असे वक्तव्य रुहानी यांनी केले. तसेच अमेरिका जर करार मोडत असेल तर त्यानंतर होणाऱ्या गंभीर परिणामांना समोर जाण्याची तयारी अमेरिकेने ठेवावी, असा थेट इशाराही त्यांनी आपल्या वक्तव्यातून दिला.
दरम्यान रुहानी यांच्या या वक्तव्याचे मुळ कारण म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्य. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मैक्रॉन हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ट्रम्प यांनी पुढील येत्या काही महिन्यांमध्ये अमेरिका इराणबरोबर झालेल्या अणु करारामधून बाहेर पडेल, असे वक्तव्य मैक्रॉन यांच्यासमोर केले होते. तसेच हा करार रद्द झाल्यानंतर काही बंधने देखील इराणवर लादण्यात येणार असल्याचे ते म्हणाले होते. ट्रम्प यांच्या याच वक्तव्यावर इराणने तिखट प्रतिक्रिया देत, थेट कारवाईची अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
@@AUTHORINFO_V1@@