आता जम्मू-काश्मीरमध्ये ही होणार 'पॉस्को' लागू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2018
Total Views |



श्रीनगर : १२ वर्षांखालील लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यदंडाची तरतूद असलेला 'पॉस्को' कायदा आता जम्मू-काश्मीरमध्ये देखील लागू करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीमध्ये आज या कायद्याला हिरवा कंदील देण्यात आला असून आता हा कायदा जम्मू-काश्मीर लागू झाला आहे. त्यामुळे अल्पवयीन (१२ वर्षांखालील) मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यास संबंधित गुन्हेगाराला थेट फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या अद्यादेशावर स्वाक्षऱ्या करत, पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हेगारांना थेट मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतुद केली आहे. सरकारच्या या निर्णयावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत होत्या. तसेच जम्मू-काश्मीरच्या विशेष राज्याच्या दर्जामुळे हा कायदा जम्मू-काश्मीरमध्ये लागू होणार का ? यावर देखील प्रश्नचिन्ह होते. परंतु नुकत्याच कठुआ येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर मंत्रीमंडळाने याला मंजुरी देत, राज्यात हा कायदा लागू केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@