तब्बल ४२ वर्षांनंतर भारतीय परराष्ट्र मंत्री मंगोलिया भेटीवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2018
Total Views |


उलानबातर : भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज या आपला चीन दौरा संपवून मंगोलियाच्या अधिकृत दौऱ्यासाठी मंगोलियामध्ये पोहोचल्या आहेत. मंगोलियन राजधानी उलानबातर याठिकाणी स्वराज यांचे आगमन झाले आहे. विशेष म्हणजे तब्बल ४२ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्री हे मंगोलियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे स्वराज यांच्या या भेटीमुळे मंगोलियामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज दुपारी स्वराज या आपल्या मेघदूत या विमानामधून मंगोल राजधानी उलानबातर येथे पोहोचल्या. यावेळी मंगोलियाच्या उप-परराष्ट्र मंत्र्यांनी स्वराज यांचे स्वागत केले. अत्यंत उत्साह आणि सौदार्हाने मंगोल मंत्र्यांनी स्वराज यांची स्वागत करून त्यांना त्यांच्या निवासस्थानी घेऊन गेले.

मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री डिमडीन सोग्तबातर यांच्या आमंत्रणावरून स्वराज या मंगोलियाच्या दौऱ्यावर गेल्या आहेत. आपल्या या एकूण दोन दिवसांच्या दौऱ्यावरमध्ये स्वराज या मंगोलियन राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री आणि सर्व प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान भारत आणि मंगोलिया यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध तसेच विविध क्षेत्रांमधील नव्या भागीदारींविषयी त्या चर्चा करणार आहेत. तसेच या भेटीत दोन्ही देशांबरोबर काही महत्त्वपूर्ण करार देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@