सर्व सामील होऊ या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2018   
Total Views |
छोटेसी दुनिया के मासूमसे सपने
किसने कुचले, रौंधे है..
न हुआ बसेरा सबेरा होने से पहले
कैसे हुआ ये अंधेरा


चिमुकल्या देहावर होणारा अत्याचार खरंतर संपूर्ण मानवतेवरच होणारा अत्याचार आहे. छोटीशी चिमुकली आईबाबांच्या त्या कुटुंबाच्याच काळजाचा तुकडा असते. नव्हे प्रत्येक मुलगी त्या त्या घरची राजकुमारीच असते हो. दुधाच्या साईसारखी तळहाताच्या फोडासारखी तिला जपले जाते. त्या कोमल कळीला, छोट्याशा बाळीला नराधमांच्या अत्याचाराला सामोरे जाताना काय नरक यातना भोगाव्या लागत असतील? शब्दच नाहीत. संताप, दुःख, संमिश्र भावना डोळ्यात आसवांच्या रूपाने जमा होतात.


लहान बालिकांवर अत्याचार करणार्‍या नराधमांना माणूस म्हणावे का? त्यांच्या कृत्याला कोणतीही सजा अपुरीच. लंडन येथे ’भारत की बात सब के साथ’ मांडताना पंतप्रधान मोदींनी बालिकांवर होणार्‍या अत्याचाराची गंभीर दखल घेत चिंता व्यक्त केली होती. नुसती चिंता व्यक्त न करता पंतप्रधान आणि त्या अनुषंगाने संपूर्ण भारत सरकारने यावर तात्काळ पावले उचलली आहेत.

बालकांवर होणार्‍या अत्याचाराला आळा घालण्यासाठी केवळ पॉक्सोच नव्हे तर भारतीय दंडविधान पुरावा कायदा सीआरपीसी कायद्यामध्येही महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १२ वर्षांखालील बालिकेवर अत्याचार करणार्‍या नराधमाला फाशीची सजा होणार आहे, तर १६ वर्षांखालील बालिकेवर अत्याचार करणार्‍या राक्षसास आजन्म कारावास तसेच अजामीनमात्र गुन्हा नोंद आहे. याबरोबरच प्रत्येक पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक उपकरण सुविधा, प्रत्येक राज्यात फॉरेन्सिक लॅब सुरू होणार आहे. बलात्काराचे खटले जलदगतीने चालवून दोन महिन्यांत निकाल आणि आरोपीने अपील केल्यास त्या खटल्यावरसुद्धा ६ महिन्यांत निकालात काढण्यात येणार आहे. सरकारने बालिकांवर होणार्‍या अत्याचाराविरुद्ध मोहीम उघडली आहे. त्या मोहिमेत भारतीय माणूस म्हणून आपण सर्व सामील होऊ या.


0000000000000
 
 
मोदी प्रतिमा नव्हे प्रतिभा


देशात कुठेही वाईट घडले तर त्याचे कारण पंतप्रधान मोदीच आहेत असे म्हणणे, हे करत असताना कोणत्याही थराला जायचे त्यातून समाजाचे, देशाचे कितीही नुकसान झाले तरी चालेल, असा एक नवा रोग काही लोकांमध्ये उत्पन्न झाला आहे. मागच्या काही घटना पाहा, बँकांना बुडवून काही लुटारू फरार झाले. महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या, बालिकांवरच्या अत्याचाराच्या घटनाही समोर आल्या. तार्किकदृष्ट्या खुल्या मनाने विचार केला तर कोणत्या सरकारला आणि पंतप्रधानांना असे वाटेल की, आपल्या कारकिर्दीत वाईट घडावेे? पण सत्ता भाजपची आणि ’मी खात नाही, कुणाला खाऊ देणार नाही,’ म्हणणारी तत्त्वनिष्ठ व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान झालेली. मग सत्तेपासून दूर असलेल्यांनी काय करावे? निराशेतूनच मग प्रत्येक वाईट घटनेला ते पंतप्रधानांना जबाबदार ठरविण्याचे कारस्थान करत आहेत.

देशाचे पंतप्रधान असल्यामुळे मोदींना विरोधकांच्या हकनाक आरोपाचे ताशेरे सहन करावे लागले, पण मोदींचे वेगळेपण यावेळीही जाणवले. विरोधकांनी केलेल्या हल्ल्याला परतविण्यासाठी पुन्हा त्यांनी शब्दांचे युद्ध खेळले नाही, तर नाहक विरोध करणार्‍यांना प्रत्युत्तर दिले ते घडलेल्या प्रसंगांना न्याय देऊनच. बँकांना बुडवून फरार झालेल्या लुटारूंची इथली मालमत्ता जारी होण्याचा अध्यादेश असू दे की बालकांचे लैगिक शोषण करणार्‍यास फाशीची सजा मंजूर करणार्‍या कायद्यात होणारी तरतूद असू दे, पंतप्रधान मोदींनी अन्याय-अत्याचारावर तात्काळ पाऊल उचलले. हे देशासाठी समाजासाठी महत्त्वाचे आहे. असो, पण आजकाल परिस्थिती अशी आहे की, देशात काहीतरी भयंकर वाईट अराजक घटना घडावी यासाठी काही लोक देव (आता हे लोक सेक्युलर वगैरे असल्यामुळे देवबिव मानत असतील का?) पाण्यात बुडवून बसलेत. कारण असे काही घडले की मोदींच्या स्वच्छ आणि लोकप्रिय प्रतिमेला कलंक लावता येईल, असे त्यांना वाटते. पण छे ! त्यांना हे माहिती नाही की मोदी ही प्रतिमा नाही तर प्रतिभा आहे. जी प्रतिभा ’हम दिन चार रहे ना रहे, तेरा वैभव अमर रहे मॉं,’ म्हणत करोडो स्वयंसेवकांच्या रूपातून श्‍वास घेते. त्यामुळे विरोधकांनी कारस्थानांचा डोंगर जरी रचला तरी सरकार ’नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’च्या भूमिकेतून निर्णय घेणार तो समाज आणि देशहिताचाच.


- योगिता साळवी
@@AUTHORINFO_V1@@