शिवसेना नेते सचिन सावंत यांची गोळ्या घालून हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
मुंबई : शिवसेना पक्षाचे नेते व शिवसेनेचे माजी उपशाखा प्रमुख सचिन सावंत यांची काल रात्री गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. मुंबईमधील कांदिवली भागातील गोकुळ नगर येथे काल रात्री काही अज्ञात बंदूकधारकांनी त्यांच्यावर भररस्त्यात गोळीबार केला. गोळीबार झाल्यावर लगेच सचिन सावंत यांना शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र रुग्णालयात डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आले.
 
 
 
काल रात्री ते आपल्या मित्रासोबत जात असतांना दोन व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांनी सरळ सचिन सावंत यांच्यावर गोळीबार केला. गोळी लागताच सावंत रस्त्यावर पडले आणि याचा फायदा घेत मारेकरी तेथून फरार झाले. मुंबईमधील कुरार पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्याप मारेकरी कोण होते याचा शोध घेतला जात आहे. 
 
 
 
सचिन सावंत हे शिवसेनेच्या मालाडमधील अप्पापाडा येथील शाखा क्रमांक ३९ चे माजी उपशाखाप्रमुख होते. शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून देखील त्यांची ओळख होती. 
@@AUTHORINFO_V1@@