सानियाच्या घरी येणार चिमुकला पाहुणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2018
Total Views |


नवी दिल्ली :  प्रसिद्ध भारतीय टेनिसपट्टू सानिया मिर्झाकडे गोड बातमी आहे. तिच्याकडे आता एक चिमुकला पाहुणा येणार आहे. याबद्दल तिने स्वत: आपल्या ट्विर आणि इंस्टाग्राम अकाउंट्सच्या माध्यमातनं चाहत्यांना सांगितलं आहे.
 
 
 
तिने एक सुंदर फोटोच्या माध्यमातून ही बातमी सांगितली. आम्हा दोघांनाही आई-बाबा होण्यासाठी ही योग्य वेळ आहे, असेही सानियाने सांगितले. यामुळे दोघेही खूप उत्साही आहोत. ही गोड बातमी आमच्या चाहत्यांना देण्यासाठी आम्ही प्रतीक्षा करू शकलो नाही. आमच्या जीवनाच्या या नवीन टप्प्यात प्रवेश करण्यास आम्ही उत्सुक आहोत असेही ती म्हणाली.
८ वर्षांआधी म्हणजेच १२ एप्रिल २०१० रोजी सानियाने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक सोबत लग्न केले होते. १५ वर्षाच्या टेनिसच्या कारकीर्दीत सानियाने सहा ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. २००४ साली सानिया मिर्झाला अर्जुन तर २००६ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@