दक्षिण आशियाई जूडो चॅम्पियनशिपमध्ये भारतीयांचे सुवर्ण प्रदर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नेपाळ : नेपाळमधील ललितपुर येथे सुरु असलेल्या ८ व्या दक्षिण आशियाई जूडो चॅम्पियनशिपमध्ये भारताने खेळाचे अतिशय उत्तम प्रदर्शन केले आहे. भारतीय महिलांनी ही सुवर्ण कामगिरी करून दाखविली आहे. भारताची गारीमा चौधरी हिने या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. ७० किलो वजनी गटात गारीमाने ही सुवर्ण कामगिरी केली आहे.
 
 
 
 
भारताच्या दिवेशने देखील पुरुष वर्गामध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. ८१ किलो वजनी गटात त्याने देखील ही सुवर्ण कामगिरी करून दाखविली आहे. भारताची जिना देवी हिने देखील ७८ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळविले आहे. भारताच्या तूलिका मान हिने ७८ किलो वजनी गटात , अजय यादव याने ७३ वजनी गटात सुवर्ण पदक मिळविले आहे.
 
 
 
या स्पर्धेच्या पदक तालीकेमध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे. भारताच्या खात्यात एकूण सुवर्ण पदकांची संख्या आता १० झाली आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अतिशय उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@