सीमेवरील शांतता दोन्ही देशांच्या हिताची : स्वराज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2018
Total Views |

भारत-चीन सीमावादावर भारताने मांडली भूमिका
 
पंतप्रधान मोदी घेणार चीनी राष्ट्राध्यक्षांशी भेट




बीजिंग : भारत आणि चीन यांच्यातील शांती आणि मैत्रीपूर्ण संबंध हे सर्व जगासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे सीमावर्ती भागामध्ये दोन्ही देशांनी शांतता राखून आपापसातील मतभेदावर तोडगा काढला पाहिजे, असे स्पष्ट मत भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज मांडले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या.

जगामध्ये होत असलेल्या वैश्विक बदलांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीन यांच्यातील संबंध चांगले राहणे हे सर्वांच्याच हिताचे आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या सीमावर सुरु असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमधून मार्ग काढणे हे दोन्ही देशांचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे भारत-चीनने परस्परांमधील मतभेद बाजूला ठेऊन यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे स्वराज यांनी म्हटले. याच बरोबर या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २७ आणि २८ एप्रिला चीन दौऱ्यावर येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.



सतलज-ब्रम्हपुत्राची मिळणार माहिती
याचबरोबर या बैठकीत सतलज आणि ब्रम्हपुत्रा नद्यांच्या जलआकडेवारी विषयी देखील चर्चा करण्यात आली असल्याचे स्वराज यांनी सांगितले. सतलज आणि ब्रम्हपुत्र नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस आणि या नद्यांचे चीनने वापरलेली पाणी याविषयी लवकरच चीन ताजी आणि योग्य आकडेवारी यापुढे भारताला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


आशिया खंडाच्या विकासावर लक्ष

भारत आणि चीन हे आशिया खंडातील दोन सर्वात मोठे देश आहेत. दोन्ही देशांचा विकास देखील अत्यंत गतीने होत आहे. त्यामुळे आशिया खंडाच्या विकासाची जबाबदारी देखील या दोन देशांवरच आहे. म्हणून चीन आणि भारत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांच्या वाढीवर दोन्ही देशांनी भर दिला पाहिजे, असे मत त्यांनी पुन्हा एकदा शेवटी मांडले
@@AUTHORINFO_V1@@