येचुरी यांची माकपच्या सरचिटणीसपदी फेरनिवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2018
Total Views |

 
हैदराबाद : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी यांची माकपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी फेरनिवड करण्यात आली आहे. हैदराबाद येथे गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या माकपच्या २२ व्या प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून येचुरी यांना दुसऱ्यांदा पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व देण्याचे बहुमताने मान्य करण्यात आले आहे. याच बरोबर पक्षाच्या विविध महत्त्वांच्या पदांसाठी एकूण ९५ अधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली आहे.
 
 
गेल्या आठवड्याभरापासून माकप नेत्यांची हैदराबादमध्ये बैठक सुरु आहे. भाजपचा संपूर्ण पराभव, हिंदुत्ववादी विचारांचे खंडन आणि लोकविरोधी आर्थिक धोरणांना परावर्तित करणे हे तीनच मुद्दे बैठकीच्या केंद्रस्थानी आहेत. गेल्या आठवड्या भरापासून या तीन विषयांवर अनेक बाजूनी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे. तसेह येत्या २०१९ च्या निवडणुकांच्या दृष्टीने देखील पक्षाची काय ध्येयधोरणे असतील यावर सर्व प्रतिनिधींबरोबर चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये घेतलेल्या विविध निर्णयांवर यावेळी जोरदार टीका करण्यात आली. तसेच मोदी सरकार देशहितासाठी घातक असल्याची टीका यावेळी सर्व वरिष्ठ नेत्यांनी केली.
 
 

 
@@AUTHORINFO_V1@@