सरकारच्या निर्णयाचे स्वागत मात्र १२ वर्षांहून मोठ्या मुलींचे काय ? निर्भयाच्या आईचा सवाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2018
Total Views |

 
सरकारने १२ वर्षांहून खालील मुलांवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र त्याहून मोठ्या वयाच्या मुलींचे काय? त्यांच्या सोबत हा गुन्हा घडला तर त्याची शिक्षा काय असेल? असा प्रश्न निर्भयाच्या आईने उपस्थित केला. १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्ली येथे सामूहिक बलात्काराच्या घटनेत बळी ज्योती सिंह म्हणजेच निर्भया हिला या गुन्ह्यामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात जनतेने रस्त्यावर येवून आंदोलने केली. अशा वाढत्या गुन्ह्यांना बघता सरकारने अखेर १२ वर्षांखालीली मुलींसोबत घडलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेत पॉक्सो कायद्यात बदल केला.
 
 
 
 
मात्र त्याहून अधिक वयाच्या मुलींचे काय? असा प्रश्न ज्योती यांच्या आईने उपस्थित केला आहे. बलात्काराहून मोठा गुन्हा दुसरा कोणता ही नाही. याहून मोठे दु:ख याहून मोठी वेदना नाही. त्यामुळे असा गुन्हा करणाऱ्या सर्वच गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच सरकारने या निर्णयावर पुन्हा एकदा फेरविचार करावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
 
सरकारच्या या निर्णयाचे संपूर्म देशाने स्वागत केले. तसेच अशा प्रकारच्या कठोर शिक्षेची आवश्यकता होती, अशा देखील प्रतिक्रिया याविषयी आल्या. मात्र ज्योती यांच्या आईने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर काय प्रतिक्रिया येते हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@