स्वराज यांनी घेतली चीनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2018
Total Views |

 
बीजिंग : शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीसाठी चीनला गेलेल्या भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेतली आहे. यावेळी भारताचे एससीओमध्ये असलेले योगदान आणि दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध यांच्यावर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
 
बीजिंगमध्ये असलेल्या दिओयूताई स्टेट गेस्ट हाउस याठिकाणी वांग यांनी स्वराज यांचे स्वागत केले. राजकीय शिष्टाचारांप्रमाणे वांग यांनी स्वराज यांचे स्वागत करत, त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये एससीओच्या आगामी बैठकीच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा करण्यात आली. तसेच भारताचा एससीओमध्ये समावेश झाल्यापासून एससीओचे कार्य आणि भारताचा त्यातील सहभाग यावर चर्चा करण्यात आली. यानंतर भारत आणि चीन यांच्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा करण्यात आल्याचे बोलले जात आहे.



 
दरम्यान या आपल्या चीन भेटी दरम्यान स्वराज या चीन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची देखील भेट घेणार आहे. या भेटी दरम्यान भारत-चीन संबंधांमधील अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर त्या शी यांच्याशी चर्चा करणार आहेत. गेल्या काही महिन्यापासून चीन सैनिकांची डोकलाम येथील हालचाल वाढली आहे. त्यामुळे या बैठकीत स्वराज याविषयाला अनुसरून चीन राष्ट्राध्यक्षांबरोबर महत्त्वपूर्ण चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@