पृथ्वी दिनानिमित्त गूगलचे खास डूडल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2018
Total Views |

 
आज जागतिक पृथ्वी दिन आहे, या दिनानिमित्त गूगल तर्फे एक खास डूडल तयार करण्यात आले आहे. या डूडलमध्ये पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जेन गूडाल यांचा व्हिडियो आहे. त्यांनी पृथ्वीदिनाचे महत्व या व्हिडियोच्या माध्यमातून सांगितले आहे.

 
 
 
या व्हिडियोमध्ये जन यांनी आपल्या लहानपणीचे अनुभव सांगत प्रकृतीसोबत असलेल्या त्यांच्या नात्याविषयी भाष्य केले आहे. तसेच प्रत्येक व्यक्ती प्रत्येक प्राणी महत्वाचा आहे. प्रत्येक प्राण्यामुळे, प्रत्येक व्यक्तीमुळे प्रकृतीवर कुठल्या ना कुठल्या रूपात प्रभाव पडतो, हा प्रभाव कसा असावा ते मात्र आपण ठरवले पाहीजे, असा संदेश देखील त्यांनी यावेळी दिला. या व्हिडियोच्या माध्यमातून जेन य़ांनी आजच्या काळात प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
प्लास्टिक प्रदूषणाविरोधात तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक खूप मोठे अभियान "अर्थ डे" च्या निमित्ताने सुरु करण्यात आले आहे. यंदाच्या पृथ्वीदिनाची संकल्पना 'प्लास्टिक प्रदूषणाविरोधात जागरुकता' आहे. नुकतेच महाराष्ट्रात देखील प्लास्टिक बॅन करण्यात आले आहे. या निमित्ताने महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पृथ्वीदिन साजरा करण्यात येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@