आ. संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, रेल्वे,पालिका प्रशासन, जलसिंचन विभाग अधिकार्‍यांची संयुक्त बैठकीत चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2018
Total Views |
 

 
 
भुसावळ, २२ एप्रिल :
भुसावळ शहरात विविध कारणंानी पाणी टंचाईची वेळ येत असते. ही समस्या कायमस्वरूपी निघण्याची शक्यता असून रविवार २२ रोजी आ. संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, पालिका प्रशासन, रेल्वे प्रशासन आणि जलसिंचन विभागाच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक होवून तसेच प्रत्यक्ष स्थळावर पाहण्ी आणि चर्चा करून काही उपाय समोर आले आहेत.
 
 
रविवारी आ.संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, विश्वेश, जलसिंचन विभागाचे बी.एस.चौधरी, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, न.पा.चे सेवानिवृत्त अभियंता अनिल चौधरी, रेल्वेचे एम.एस.तोमर व देशपांडे, आदींची शासकिय विश्रामगृहात बैठक होवून प्रत्यक्ष तापी नदीवरील बंधार्‍याची पाहणी केली.
यावेळी झालेल्या चर्चेनुसार न.पा.ची जॅकवेल नदीच्या किनार्‍यापासून केवळ २ मी. लांब आहे. जल पातळीपासून १ मी. उंचीवर आहे. तसेच जलवाहिनी ५५० मी.मी. व्यासाची आहे. यामुळे बंधार्‍यातील जलपातळी खालावताच पालिकेला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. रेल्वे प्रशासनाच्या १२ जॅकवेल नदीच्या किनार्‍यापासून ३० मिटर आत आहेत. रेल्वेची जलवाहिनी ३ मीटर व्यासाची आहे. रेल्वे प्रशासनाचे २ पंपींग स्टेशन आहेत. रेल्वेला अखंडीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी ३०० अश्वशक्तीचे १२ पंप असून त्यापैकी ४ पंप ३ तीन तासांच्या अंतराने चालत असतात. रेल्वेप्रशासनाचे २ पंप स्टँडबाय असतात. याउलट न.पा.कडे ३०० अश्वशक्तीचे २ पंप आहेत. त्यातील १ पंप कायम सुरू असतो. तर एक पंप अतिरिक्त आहे. पालिकेकडे एकच जलशुद्धीकरण केंद्र आहे.
 
 
न.पा.ची अडचण ही पाण्याची जॅकवेल आहे. जलपातळी मॅच होत असल्याने ही अडचण होते. जलसिंचन विभागाने यावर उपाय सुचवितांना सॅाफ्ट आणि कंट्रोल बास्टींग करुन खडकाळ परिसरातून जॅकवेलपर्यंत चारी केली, तर १४ फुट खोली जॅकवेलला लाभेल. यामुळे पाण्याची पातळी चांगली राहिल. तसेच जैन इरिगेशनमार्फत सायपनिंग तंत्रज्ञानाचा उपाय सुचविण्यात आला. यातंत्रज्ञानामुळे जलसाठयातून पाणी जॅकवेलमध्ये टाकले जाईल. रेल्वे प्रशासनाने यावर तोडगा काढतांना रेल्वे प्रशासनाने १९२२ मध्ये जेव्हा जलशुद्धीकरण केंद्र उभारले तेव्हा नदीवर २.९० मीटर उंचीचा बंधारा बांधला आहे. त्यावेळेस रेल्वेची जुनी जलवाहिनी आहे त्यात पंप टाकून पालिका पाणी वापरू शकते. त्यामुळे जलटंचाई संपुष्टात आणता येईल. तर सेवानिवृत्त अभियंता अनिल चौधरी यांनी नदीपात्रात विज कंपनीचे ६ खांब उभारावे आणि ८० अश्वशक्तीचा पंप लावल्यास पाणी खेचून जलटंचाईवर मात करता येईल. अशी सुचनाही मांडली.
 
 
हतनूर धरणाचा साठा मिळण्याची सकारात्मकता
हतनूर धरणात ४० टक्के गाळ आहे. त्यातही मृत जलसाठा आहे. रेल्वे प्रशासन जर न.पा.साठी पाण्याचे सहाय्य करणार असेल तर सामाजिक वापराच्या शुल्कात जलसिंचन विभाग धरणाच्या मृत साठयातील पाणी सोडण्यास तयार आहे. यासाठी लागणारे शुल्क रेल्वे प्रशासन सीएसआर निधीतून अदा करणार असल्याचे चिन्ह आहेत. टायपनींग तत्रं वापरून त्याद्वारे नियमीत जलपुरवठा होवू शकतो.
 
 
रेल्वेची मदत होणार
रेल्वेचे डीआरएम यांनी त्यांच्याकडे जलशुध्दीकरण केंद्राचे सर्व अधिकार असतांना रेल्वेचे जलशुध्दीकरण केंद्र ते न.पा. जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत एक व्हॉल्व ठेवण्यात आला आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा रेल्वे हा व्हॉल्व उघडून देणार असल्याची तयारी दर्शवली असून तसा करार करून देण्याची तयारी असल्याचे संकेत दिले आहे. दीपनगरच्या बंधार्‍यात मृत जलसाठा असतो. तो साठा पालिका प्रशासनास देण्यात दीपनगर प्रशासन तयार आहे.
 
 
तापी पात्रात बोटींग होणार
न.पा.मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी महावितरणकडून जे पोल टाकले जातील त्यावर ८० अश्वशक्तीचा पंप बसविण्यात येईल. तसेच जैन यांच्याकडील दोन अद्यावत पंप बसविण्यात येतील. तेव्हा उपलब्ध होणार्‍या पाण्यावर नदीपात्रात बोटींग सुरू करून त्याद्वारे या पंपाचा देखभालीचा खर्च उपलब्ध करायचा अशी उपाय योजना सुचविली आहे.अशा प्रकारे भुसावळ शहराची पाणी टंचाई निवारणाच्या विविध उपाय योजना रविवार रोजी झालेल्या बैठकीत सुचविण्यात आल्या असल्याने भविष्यात शहराची पाणी टंचाई समस्या कायमस्वरूपी निकाली निघण्याची शक्यात निर्माण झाली आहे.
 
 
सौर उर्जेवरील दोन पंप मिळणार
शहरातील पाणी टंचाई निवारण्यासाठी ५० अश्वशक्तीचे सौरउर्जाचे अद्यावत दोन पंप अमृत योजनेच्या सीएसआर अंतर्गत देण्याची जैन इरिगेशनचे अशोक जैन यांनी तयारी दर्शवली आहे.
  
@@AUTHORINFO_V1@@