नक्षलवादीविरोधी मोहिमेत पोलिसांना मोठे यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2018
Total Views |

१४ नक्षलवाद्यांच्या खात्मा



गडचिरोली : नक्षलवाद्यांविरोधात पोलिसांकडून सुरु करण्यात आलेल्या 'कोबिंग ऑपरेशन' या मोहिमेमध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गडचिरोलीतील भामरागड येथे एकूण १४ नक्षलवाद्यांच्या खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज याविषयी माहिती दिली असून यामध्ये काही कुख्यात नक्षलवाद्यांचा देखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

भामरागड तालुक्यातील ताडगाव येथील जंगलांमध्ये ही कारवाई करण्यात आली. नक्षलवाद्यांच्या शोधासाठी गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे याठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली होती. पोलिसांनी जंगलामध्ये शोधमोहीम सुरु केल्यानंतर याठिकाणी दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अचानक गोळीबार सुरु केला. यावेळी सावध असलेल्या पोलिसांनी देखील त्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. यामध्ये एकूण १४ नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलीस जवानांना यश आले.

दरम्यान चकमकीमध्ये जहाल नक्षली म्हणून ओळखले जाणारे कमांडर साईनाथ आणि सिनुहर या दोघांचा देखील खात्मा पोलिसांनी केला आहे. साईनाथ आणि सिनुहर हे दोघे गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या 'हिट लिस्ट'मध्ये सामील होते. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस यांचा शोध घेत होते. अखेरकार या दोघांना देखील ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@