सिद्धरामय्या लढवणार 'बदामी' मधून निवडणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2018
Total Views |


बदामी : कर्नाटक विधानसभा निवडणुका आत अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यापार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आपापल्या रणनीती बनवण्यामध्ये गुंतले आहेत. कॉंग्रेस पक्षाने देखील निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मतदारसंघ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या निवडणुकांमध्ये वरुणा मतदारसंघामधून निवडणू आलेले सिद्धरामय्या यंदाच्या निवडणुकीमध्ये 'बदामी'मधून निवडणूक लढवणार असल्याचे कॉंग्रेस पक्षाने जाहीर केले आहे. कॉंग्रेस ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयामुळे निवडणूक रिंगणात सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहे.

कॉंग्रेस पक्षाने आज आपल्या ११ उमेदवारांची एक अंतिम यादी जाहीर केली असून या यादीमध्ये सिद्धरामय्या हे बदामी मतदारसंघामधून निवडणूक लढवणार असल्याचे यात सांगण्यात आले आहे. बदामीमधील पूर्वनियोजित उमेदवार डॉ. देवराज पाटील यांच्या जागी सिद्धरामय्या हे आता या भागातून निवडणूक लढवतील, असे पक्षाने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे भाजपने मात्र अद्याप बदामी मतदार संघासाठी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. तसेच ही मित्रपक्षाला देणार का ? हे देखील अजून जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु ऐनवेळी सिद्धरामय्या यांना बदामी मधून तिकीट दिल्यामुळे कर्नाटक राजकारणात थोडी 'खोचक' चर्चा सुरु झाली आहे.

@@AUTHORINFO_V1@@