सुषमा स्वराज आजपासून चीनच्या चार दिवसीय दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आजपासून चार दिवसीय चीनच्या दौऱ्यासाठी रवाना झाल्या आहेत. शांघाई सहयोग संघटना यांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी आज त्या या दौऱ्यासाठी गेल्या आहेत. या बैठकीत सुषमा स्वराज इतर देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधणार असून चीनसोबत विभिन्न मुद्द्यांवर चर्चा करणार आहे.
 
 
 
या दौऱ्यात नरेंद्र मोदी चीन आणि मंगोलिया या दोन ठिकाणी जाणार असून हा दौरा २१ ते २६ तारखेदरम्यान असणार आहे. आज सकाळी तीन देशांच्या यात्रेवर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिल्ली येथील विमानतळावर सुषमा स्वराज यांनी स्वागत केले. यानंतर सुषमा स्वराज यांनी आपल्या चीन दौऱ्याला सुरुवात केली.
 
 
 
भारत आणि चीनचे संबंध जरा नाजूक असले तरी देखील जागतिक स्तरावर चीन आणि भारत एकमेकांचे संबंध चांगले ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो. त्यामुळे या बैठकीत देखील चांगली चर्चा होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@