शाह हे सनातन हिंदू : जावडेकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |


नवी दिल्ली : अमित शाह हे नुसते हिंदू नसून ते 'सनातन हिंदू' आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शाह यांच्या धर्माविषयी निर्माण केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना ते बोलत होते.

'अमित शाह हे सनातन हिंदू आहेत. त्यामुळे त्यांच्या धर्मावर प्रश्न चिन्ह निर्माण करण्याअगोदर सिद्धरामय्या आणि कॉंग्रेस या दोघांनी देखील आपल्या स्वतःकडे अगोदर पाहावे, अशी खोचक टीका देखील त्यांनी केली. तसेच कर्नाटकात सध्या नव्या परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसने भाजप आणि शाह यांची धास्ती घेतली आहे. निवडणुकांमध्ये मते मिळवण्यासाठी असे नाना प्रकारचे 'स्टंट' कॉंग्रेस करत आहे, परंतु जनतेला खरे-खोटे यातील फरक करता येतो आणि तेच त्यांना योग्य ते प्रत्युत्तर देतील, असे देखील जावडेकर यांनी यावेळी म्हटले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल एका प्रचार सभेत शाह हे हिंदू नसल्याचे विधान केले होते. 'शाह हे कर्नाटकात येऊन हिंदू धर्माविषयी आवेशपूर्ण भाषणे देत आहेत. परंतु ते स्वतः हिंदू आहेत का ?' असा प्रश्न सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला होता. शाह हे जैन असून ते फक्त हिंदुत्वाला मानतात. त्यामुळे ते हिंदू असूच शकत नाही, असे देखील रामय्या यांनी म्हटले होते. यावर भाजपने कॉंग्रेसच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
@@AUTHORINFO_V1@@