खोटारडेपणा उघड पडल्यामुळे महाभियोग : मीनाक्षी लेखी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |

कॉंग्रेसचे हे राजकारण अत्यंत हीन असल्याची प्रतिक्रिया





नवी दिल्ली :
'कॉंग्रेसने सातत्यने भाजप आणि इतर देशभक्त नेत्यांवर खोटे आरोप करत त्यांच्यावर कारवाई केली आहे. परंतु आता यांच्या खोटारडेपणा जनतेसमोर येऊ लागल्यामुळे कॉंग्रेस सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग भरवत असून कॉंग्रेस अत्यंत हीन दर्जाचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनी केला आहे. कॉंग्रेसने सरन्यायाधीश मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग भरवण्यासंबंधी केलेल्या घोषणेनंतर भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या.


'कॉंग्रेस हिंदू दहशतवादाच्या नावाखाली याअगोदर अनेक राष्ट्रभक्त लोकांवर खोट्या कारवाया केल्या होत्या. भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना देखील खोट्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रकरणांची शाहनिशा करून सबळ पुराव्यांअभावी सर्वांना निर्दोष मुक्त केले आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाला. न्यायाधीश चंद्रचूड यांनी खोट्याआरोपांविरोधात विरोधी पक्षांवर कारवाई करण्याचा सल्ला देखील भाजपला दिला होता. परंतु भाजपने तसे केले नाही. परंतु आता मात्र आपल्या पाया खालची वाळू सरकत असल्याचे पाहून काँग्रेसने न्यायपालिकेविरोधातच कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यावरूनच काँग्रेस किती खालच्या थराला जाऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे' अशी टीका त्यांनी यावेळी केली.


मीनाक्षी लेखी यांची पत्रकार परिषद :


संविधानासाठी काळा दिवस

गेल्या अनेक वर्षांपासून भारतात राजकीय आरोपप्रत्यारोप आणि वाद होत आले आहेत. परंतु न्यायपालिकेला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न कोणत्याही पक्षाने केला नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या विश्वासाने संविधान आणि न्यायप्रक्रियेची स्थापना केली आहे. पण कॉंग्रेस मात्र आज सर्वच प्रकारच्या मर्यादांचे उल्लंघन करत थेट न्यायपालिकेलाच राजकीय वादात खेचले आहे. त्यामुळे संविधानासाठी आज काळा दिवस असल्याचेच म्हणावे लागेल, असे त्या म्हणाल्या. 

 

@@AUTHORINFO_V1@@