सरकारनंतर आता सरन्यायाधीशांवर कॉंग्रेसचा निशाणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात भरवणार महाभियोग



नवी दिल्ली :
केंद्र सरकारवर अविश्वास ठराव मांडण्यात अयशस्वी झाल्यानंतर आता कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी आपला मोर्चा सर्वोच्च न्यायालयाकडे वळवला आहे. जस्टीस लोया यांच्या मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काल दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचाविरोधात महाभियोग निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे. लवकरच राज्यसभेत हा प्रस्ताव मांडला जाणार असून सर्व पक्ष यासाठी सहमत असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष आता महाभियोगाचा देखील राजकीय करू पाहत आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कॉंग्रेस पक्षाचे प्रक्ते कपिल सिब्बल, राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद आणि अन्य कॉंग्रेस नेत्यांनी आज नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेमध्ये आझाद यांनी सरन्यायाधीशांच्या कार्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मिश्रा यांच्यावर महाभियोग भरवण्याचा निर्णय सर्व विरोधी पक्षांनी घेतला असल्याची माहिती आझाद यांनी दिली. तसेच याविषयी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन त्यांच्याशी देखील या विषयी चर्चा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यसभेच्या पुढील सत्रामध्ये मिश्रा यांच्यासंबंधी अविश्वास ठराव मांडण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.



कपिल सिब्बल यांनी देखील यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतीय संविधानावर आणि न्यायप्रक्रियेवर संपूर्ण देशाचा विश्वास आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या काही घटनांमुळे सामान्य नागरिकांचा न्यायपालिकेवरील विश्वास डगमगू लागला आहे. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून त्यासाठी आता सर्व राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच जस्टीस लोया यांच्या हत्येच्या घटनेचा उल्लेख करत यामध्ये संशय घेण्यासारख्या असताना देखील न्यायालय याची सीबीआय चौकशी करण्यास का नकार देत आहे ? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

कॉंग्रेस नेत्यांची पत्रकार परिषद : 


@@AUTHORINFO_V1@@