भिवंडीमध्ये शिवसेनेच्या तालुका उपप्रमुखाची हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |


शहापूर : नगरमध्ये दोन शिवसैनिकांची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर आता भिवंडीमध्ये देखील एक शिवसैनिकाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भिवंडीतील शहापूर तालुक्यातील निलेश निमसे या शिवसैनिकाची हत्या करण्यात आली असून हत्येनंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळण्यात आल्याचा देखील प्रकार घडला आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून यासंबंधीचा पुढील तपास केला जात आहे.

निलेश निमसे हे शिवसेनेचे शहापूर तालुक्याचे उपप्रमुख होते. आज दुपारी शहापूरमधील अंबाडी येथे निमसे यांचा गाडी बेवारसपणे उभी असल्याची आढळून आली होती. यानंतर येथील काही स्थानिक नागरिकांनी गाडीजवळ जाऊन पाहणी करत असताना, त्याठिकाणी अर्धवट अवस्थेत जळलेला मृतदेह त्यांना आढळून आला. यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांना याविषयी माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह आणि गाडी आपल्या ताब्यात घेतली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये हा मृतदेह निमसे यांचा असल्याचा आणि ही घटना काल रात्री झाल्याचे समोर आले. दरम्यान घटनेचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. परंतु ही घटना राजकीय वैमनस्यातूनच घडल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच नगरमध्ये देखील अशाप्रकारे दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे नगरमधील भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या दोन पक्षांचा हात असल्याचे तपासामध्ये आढळून आले होते. यावर शिवसेनेनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक घटना समोर आल्यामुळे पुढे काय होणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@