तुकाराम मुंढे यांच्या विरोधात २३ एप्रिलला अविश्‍वासाचा ठराव?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : शहरातील सर्व जमिनीवर करवाढ लादणार्‍या मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयामुळे सत्ताधारी आणि विरोधक असे सर्वच नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात नाराज झाले असून या करवाढीच्या निर्णयाविरोधात आक्रमक होत येत्या २३ एप्रिलला होणार्‍या महासभेत आयुक्त मुंढे यांच्यावर अविश्वास आणण्याची तयारी केली जात आहे. याकरिता मनपा अधिनियमांचा आधार घेतला जात आहे. त्यामुळे ही महासभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
 
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या करवाढीच्या निर्णयाला तीव्र विरोध होत असून आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात आता थेट सत्ताधारी भाजपच मैदानात उतरला आहे. सत्ताधारी आमदारांना मतदारसंघात फिरताना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. नव्या मिळकतींना नवीन करवाढ लागू असल्याने विशेषतः गावठाण भागातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. महासभेत आयुक्त नियमांकडे बोट दाखवत सर्वांची तोंडं गप्प करत आहेत. त्यामुळे त्याच महासभेला असलेल्या अधिकारानुसार नगरसेवक करवाढीच्या माध्यमातून जाब विचारणार आहे. त्यासाठी येत्या २३ एप्रिल रोजी विशेष महासभा बोलावली आहे. यासाठी रामायणावर बसून भाजपचे नगरसेवक अभ्यास करत आहेत.आयुक्तांविरोधात प्रस्ताव सादर करण्यासाठी विरोधकांची तयारी सुरू आहे.
 
महापालिकेत सामाविष्ट असलेल्या २३ खेड्यांमध्ये आजही शेतीव्यवसाय केला जात आहे. विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर या खेड्यांमधील मोठ्या प्रमाणात जमिनी पिवळ्या पट्ट्यात आल्या आहेत. या वडिलोपार्जित जमिनीत पिके घेतली जात आहेत. अशा जमिनींवर कर लावण्याचा निर्णय अन्यायकारक आहे, असे मत शेतकर्‍यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता या विरोधात महासभा सुरू असताना मनपा प्रवेशद्वारावर शेतकर्‍यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@