नरोदा पाटिया प्रकरण : माया कोडनानी मुक्त, बाबू बजरंगीला आजन्म कैद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
गुजरात : गुजरात मधील नरोदा पाटिया प्रकरणाचा निकाल आज गुजरात उच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. या निकालात माजी भारतीय जनता पक्षाच्या मंत्री माया कोडनानी यांची गुजरात उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली असून बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगीला आजन्म कारावास सुनावण्यात आला आहे. गुजरात उच्च न्यायालयाकडून आज मोठा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
 
 
 
गुजरातमधील नरोदा पाटिया हे अतिशय गाजलेले प्रकरण मानले जाते. २००२ मध्ये गुजरात दंग्यांमध्ये अहमदाबादमधील नरोदा पाटिया भागात ९७ नागरिकांची हत्या करण्यात आली होती. हा नरसंहार २८ फेब्रुवारी २००२ रोजी करण्यात आला होता. या दंग्यांमध्ये ३३ नागरिक जखमी देखील झाले होते. ही घटना २७ फेब्रुवारी २००२ मध्ये गोधरामध्ये साबरमती रेल्वे गाडीला आग लावण्याच्या घटनेच्या एक दिवसानंतर झाली होती.
 
 
या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात २००९ मध्ये सुरु झाली होती. ६२ आरोपींच्या विरोधात न्यायालयात आरोप प्रविष्ट करण्यात आले होते. या प्रकरणामध्ये माया कोडनानी आणि बाबू बजरंगी यांच्या विरोधात देखील आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. हत्या आणि या घटनेचा कट रचण्यात या दोघांचा देखील हात होता असा आरोप या दोघांवर लावण्यात आला होता. आता या प्रकरणाची सुनावणी झाली असून आज गुजरात उच्च न्यायालयाने माया कोडनानी यांची निर्दोष मुक्तता आणि बाबू बजरंगीला आजन्म कारावास सुनावला आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@