रेडिओ माध्यमाची ओळख विद्यार्थांच्या करिअरला दिशा देणारी - डॉ. नितीन करमळकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |
 
 

 
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘रेडिओ माध्यम – संभाषण कला’ या कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा प्रमाणपत्र वितरण समारोह मा. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
 
विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ व विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य विकसित करणे आणि रेडिओ माध्यमाचा त्यासाठी सदुपयोग करून घेणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमाचा लाभ ५६ विद्यार्थ्यांनी घेतला, त्यातही ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्यांची संख्या जास्त होती. त्यांना विद्यापीठातील तज्ज्ञ मार्गदर्शकांबरोबरच उद्योग क्षेत्रातील मान्यवर विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय या सर्व विद्यार्थ्यांना विद्यावाणी रेडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रेडिओ कार्यक्रम सादर करण्याचा अनुभव ही मिळाला. 
यावेळी मा. कुलगुरू म्हणाले “आपल्या समोरच्याला समजून घ्यायचे असेल तर मुळात आपण काय आहोत हे त्याला समजलं पाहिजे आणि ते सांगण्यासाठी तुम्ही व्यक्त झाले पाहिजे आणि त्यासाठी रेडिओ हे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि अपेक्षा समजून घेण्याकरिता मी रेडिओ माध्यमाचा वापर करतो. "प्रश्न तुमचे उत्तर कुलगुरूंचे" या रेडिओ कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. रेडिओवर तुम्ही दिसत नाहीत पण तुमचे हावभाव तुमच्या वाणीतून तुम्हाला व्यक्त करता आले पाहिजे. अमीन सयानी, आंनद देशमुख, सुधीर गाडगीळ अशी असंख्य उदाहरणे आहेत ज्यांच्या वाणीने लोकांना जिंकलेय. संवाद हा महत्त्वाचा आहे आणि ती कला जोपासणे वृद्धिंगत करणे महत्त्वाचे आहे आणि संवादातून आपण जग जिंकू शकतो. त्याची सुरुवात आपण या विद्यावाणीच्या "रेडिओ माध्यम - संवाद कला" या उपक्रमातून केली आहे.”
 
 
 
या वर्गात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. सदानंद भोसले, माध्यम समन्वय विभागाचे विशेष कार्याधिकारी अभिजित घोरपडे, विद्यावाणीचे संचालक आनंद देशमुख, कोर्पोरेट क्षेत्रातले सतीश आरळकर, प्रसाद मराठे, अरविंद देशपांडे, अंजली वायदंडे, आणि डॉ. राम गुंडगिला, नदीम काझी, डेविड वायदंडे, प्रतिभा मोरे यांनी या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यावाणीचे संचालक आनंद देशमुख यांनी केले, तर प्रा. डॉ.प्रभाकर देसाई यांनी विद्यार्थी विकास मंडळाची भूमिका विशद केली.
 
@@AUTHORINFO_V1@@