चंद्राबाबू नायडू यांच्या एकदिवसीय उपोषणाला सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
विजयवाडा : केंद्र सरकार राज्य सरकारला सहयोग करीत नसल्याने आज आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज आपले उपोषणाचे अस्त्र उचलेले आहे. आज विजयवाडा येथील अमरावती येथे सकाळपासून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे उपोषणाला बसले आहेत. आज आंध्रप्रदेशमधील अमरावती येथे आपल्या ६८ व्या वाढदिवसाच्या दिवशी चंद्राबाबू नायडू यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
 
 
 
 
‘आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा द्या’ या मागणीला केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने आता चंद्राबाबू नायडू यांनी आपले उपोषण अस्त्र उचलेले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चंद्राबाबू नायडू यांनी ‘आंध्रप्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा द्या’ अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती मात्र या मागणीला केंद्र सरकारने दुर्लक्षित केले. तसेच आंध्रप्रदेशला विशेष सवलती देखील दिल्या जातील या केंद्र सरकारच्या आश्वासनाला केंद्र सरकारने पूर्ण केले नसल्याने आता चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@