अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यास आता फाशीची शिक्षा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रस्तुत केलेल्या पॉक्सो कायद्याच्या दुरुस्तीसाठीची प्रक्रिया आजपासून सुरु केली आहे. या संशोधनामुळे ० ते १२ वयाच्या मुलींवर बलात्कार केल्यास अधिकाधिक शिक्षा किंवा फाशीची शिक्षा देखील दिली जाईल असे नमूद करण्यात आले आहे. आज या कायद्यावर सुनावणी करण्यात आली आहे. आता या कायद्याची पुढील सुनावणी २७ एप्रिलला करण्यात येणार आहे.
 
 
 
गेल्या १० जानेवारीला जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील रासना या गावातील एक बकरवाल मुस्लीम समुदायातील ८ वर्षीय असिफा आपल्या घरातून बेपत्ता झाली होती. खूप वेळ शोधाशोध केल्यानंतर देखील तिचा काही थांगपत्ता न लागल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये याविषयी तक्रार केली. यानंतर पोलीस तपास करत असताना १७ जानेवारीला असिफाचा मृतदेह रासना गावाजवळील जंगलामध्ये पोलिसांना आढळून आला.
 
 
 
यानंतर मृतदेहाची वैद्यकीय तपासणी केली असता असिफावर अनेक वेळा सामुहिक अत्याचार केल्याचे समोर आले. तसेच आठवडाभर तिला उपाशी ठेवून फक्त नशेच्या गोळ्या खाऊ घातल्याचे समोर आले. त्यानंतर तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. हे असे प्रकरण देशात घडत असल्याने या कायद्यात बदल करण्यात येत आहे त्यामाध्यमातून अशा नराधमांना शिक्षा होईल. 
 
@@AUTHORINFO_V1@@