कर्नाटक निवडणुका : भाजपकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |


बंगळूरू :
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी देखील आज जाहीर केली आहे. या यादीमध्ये एकूण ४७ उमेदवारांचा समावेश असून भाजपने आतापर्यंत एकूण २०१ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

उत्तर कर्नाटक आणि पश्चिम कर्नाटकातील बऱ्याचशा विधानसभा जागांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर असलेल्या बेळगाव जिल्हातील दोन विधानसभा मतदारसंघांसाठी असलेल्या आपल्या दोन उमेदवारांची नावे देखील भाजपने आज जाहीर केलेली आहेत. यामध्ये उत्तर बेळगावसाठी अनिल बेनके आणि दक्षिण बेळगावसाठी अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान भाजपने या अगोदर आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केलेल्या आहेत. यातील पहिली यादी ही भाजपने ८ एप्रिलला तर दुसरी यादी १६ एप्रिल रोजी जाहीर केली होती. या दोन्ही यादांमध्ये अनुक्रमे ७२ आणि ८२ उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केलेली आहेत. परंतु भाजप सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे भाजपने जाहीर केलेले आहे. त्यामुळे आणखी २४ जागांसाठी भाजप कोणाकोणाला उमेदवारी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजप उमेदवारांची  पहिली यादी :



भाजप उमेदवारांची दुसरी यादी : 

@@AUTHORINFO_V1@@