स्त्री आणि पुरुष स्वच्छतागृहाच्या संख्येत ६४ टक्के तफावत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Apr-2018
Total Views |

नागरिकांच्या तक्रारीमध्ये वाढ
प्रजा फाऊंडेशनच्या अहवाल जाहीर
 
 

 
 
मुंबई : मुंबईत स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी असलेल्या स्वच्छतागृहाच्या संख्येत असमानता असून यामधील तफावत ६४ टक्के आहे. अशी माहिती फाऊंडेशनचे संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्थ नीताई मेहता यांनी दिली. नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या तक्रारीबाबत सभागृहात केलेली चर्चा याबाबतचा अहवाल प्रजा फाऊंडेशनने जाहीर केला. त्यावेळी मेहता बोलत होते.
 
यावेळी बोलताना मेहता म्हणाले कि, मुंबईतील सार्वजनिक स्वछतागृहांमध्ये टॉयलेटच्या सिटीमध्ये मोठी तफावत आहे असे अहवालामध्ये दिसते. स्त्री आणि पुरुषांसाठी बांधण्यात आलेल्या स्वछतागृहांच्या उपबलब्धतेत तफावत आहे. तर सी विभागातील मरिन लाईन्स या प्रभागाला ऐतिहासिकदृष्ट्या महत्व असून या विभागात प्रवासी संख्या मोठी आहे. परंतु याठिकाणी स्वच्छतागृहांच्या संख्येत ८५ टक्के तफावत असून महिलांच्या स्वछतेसारख्या पायाभूत सुविधांवर लक्ष पुरविण्याची गरज आहे.
 
मुंबई महापालिकेविरोधात नागरिकांमध्ये असंतोष आहे. नागरिकांकडून महापालिकेकडे करण्यात येणाऱ्या तक्रारींच्या संख्येत तब्बल ४९ टक्क्यांची वाढ झाली आहे. सन २०१५ मध्ये ६१ हजार ९१० तक्रारी आल्या होत्या, सन २०१७ मध्ये यात वाढ होऊन ९२ हजार ३२९ तक्रारी आल्या. २०१५ मध्ये तक्रार निवारण करण्यासाठी १५ दिवसाचा कालावधी लागत होता. २०१७ मध्ये या कालावधीत वाढ होऊन तक्रार निवारण करण्यास ४८ दिवस लागत असल्याचे मेहता यांनी सांगीतले. मुंबई महापालिकेकडे तक्रारींची संख्या वाढत असताना २०१६ मध्ये महापालिकेने फक्त ५८ टक्के तक्रारींवर कारवाई केली होती. त्यात २०१७ मध्ये वाढ झाली असून ८३ टक्के तक्रारींवर पालिकेने कारवाई केली असल्याची माहिती मेहता यांनी दिली.
 
तर प्रजा फाउंडेशनचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के म्हणाले की, मार्च २०१७ ते ते डिसेंबर २०१७ या कालावधी दरम्यान ३८ नगरसेवकांनी प्रभाग समिती बैठकीमध्ये एकही प्रश्न विचारलेला नाही. यात पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेचे १७ नगरसेवक आहेत. प्रश्न न विचारणाऱ्या ३८ नगरसेवकांपैकी ११ नगरसेवक मागील वर्षी संपन्न झालेल्या निवडणुकीत पुन्हा निवडून आले आहेत. २०१२ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांनी ६९७ प्रश्न विचारले होते. २०१७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांनी ८५६ प्रश्न विचारले आहेत. २०१२ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांच्या तुलनेत २०१७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांनी जास्त प्रश्न विचारल्याचे म्हस्के यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@