चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांना योग्य सोयीसुविधा द्याव्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2018
Total Views |



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आढावा बैठकीत निर्देश


मुंबई : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभीमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसुविधांची योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबई महानगरपालिकेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची आढावा बैठक सोमवारी पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सदर निर्देश दिले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, आ. राज पुरोहित, मुख्य सचिव सुमीत मल्लिक, मुंबई मनपा आयुक्त अजोय मेहता, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर भेट देण्यासाठी येतात. यावर्षी १२७ व्या जयंतीनिमित्त येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी संबंधित विभागांनी आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दरम्यान, सुविधाबाबत सर्व संबंधित विभागांनी योग्य ती कार्यवाही करावी. तसेच चैत्यभूमीला भेट देणाऱ्या अनुयायांची गैरसोय होणार नाही यांची दक्षता घेण्यात यावी, चैत्यभूमी स्मारक संरक्षण भिंतीलगत काॅंक्रिट टेट्रापॅाड टाकण्याच्या कामाला गती देण्यात यावी, असे निर्देशदेखील मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@