व्यापार युद्धात चीनचे अमेरिकेला प्रत्युत्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2018
Total Views |

अमेरिकेहून आयात होणाऱ्या वस्तूंवर वाढवला कर




बीजिंग : अमेरिका आणि चीन यांच्यात सुरु असलेले व्यापार युद्ध आता हळूहळू वाढू लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या महिन्यात अमेरिकेने चीनी वस्तूंवर लावलेल्या अतिरिक्त कर आणि बंधनांना आता चीनने देखील त्याच भाषेत उत्तर दिले आहे. अमेरिकेच्या या कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेहून आयात होणाऱ्या वस्तूंवर चीनने देखील भरमसाठ कर लावण्याचा निर्णय घेतला आहे व त्याची अंमलबजवणी देखील सुरु केली आहे.

चीनच्या अर्थ मंत्रालयाने काल रात्री एक परिपत्रक काढले असून यामध्ये अमेरिकेहून आयात करण्यात येणाऱ्या १२८ वस्तूंवर वाढीव कर आकारणार येणार असल्याचे यात म्हटले आहे. यानुसार अमेरिकेतून आयात होणारी फळे आणि त्या संबंधित १२० वस्तूंवर १५ टक्के वाढीव कर घेण्यात येणार आहे. तसेच मांस आणि इतर काही वस्तूंवर २५ टक्के वाढीव कर आकारण्याचे निर्देश चीनी अर्थ मंत्रालयाने दिले आहेत. तसेच आजपासूनच हा वाढीव कर लागू करण्यात येणार असल्याचे देखील चीनी अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान हा निर्णय चीनच्या आर्थिक हिताच्या आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने घेतला गेला आहे, असे स्पष्टीकरण चीनच्या अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. चीन हा बहुव्यापारिक दृष्टीकोन ठेवणारा देश आहे. त्यामुळे चीन हा सर्व देशांच्या आर्थिक हिताचा विचार करूनच प्रत्येक पाऊल टाकतो. परंतु अमेरिकेने चीनी वस्तूंवर लावलेल्या भरमसाठ करामुळे चीनला मोठा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ही तुट भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अमेरिकेने चीनसंबंधी घेतलेल्या निर्णयाला हे एक योग्य आणि न्यायसंगत प्रत्युत्तर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@