वरळी येथे आगरीकोळी भूमिपुत्र संघटनांची समाज परिषद संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2018
Total Views |




 

मुंबई: आगरी सेवा संघ, वरळी यांच्या माध्यमातून आयोजित, आगरीकोळी भूमिपुत्रांची आगरी कोळी समाजिक परिषद, जनता हायस्कूल वरळी येथे संपन्न झाली. या परिषदेचे उद्घाटन स्थानिक आमदार सदा सरवणकर आणि सुरेश शिंदे, मुंबई महापालिकेच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर, कामगार नेते श्याम म्हात्रे व दशरथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि नवी मुंबई परिसरातून ४६ संघटनांनी आपली उपस्थिती नोंदवली, तर ३४ संघटनांनी प्रत्यक्ष चर्चा सत्रांत सहभाग घेतला. यावेळी आमदार सदा सरवणकर, सुरेश शिंदे आणि उपमहापौर वरळीकर यांनी मुंबईमध्ये आगरीकोळी बांधवांसाठी समाजभवन उभारण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. यावेळी राज्य सरकारने ज्याप्रमाणे भीमा-कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घेतले, त्याच प्रमाणे नेवाळी सह, नवी मुंबई ठाणे रायगड मुंबई परिसरातील भूमिपुत्रांच्या आंदोलनादरम्यान जे गुन्हे नोंदवले गेले, तेही मागे घेण्यात यावेत असा ठराव मांडण्यात आला आणि सर्व उपस्थित संघटनांनी त्या ठरावास अनुमोदन देत एकमताने सदरचा ठराव पास करण्यात आला. यावेळी चर्चा सत्राच्या निरीक्षकाची भूमिका सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे वकील ऍड. भारद्वाज चौधरी, हायकोर्टाचे वकि ऍड. साजन पाटील आणि आगरी दर्पण मासिकाचे संपादक दीपक म्हात्रे यांनी पार पाडली, तर चर्चासत्राच्या सूत्र संचालनाची जबाबदारी आगरी-कोळी युथ फाउंडेशनचे निलेश पाटील यांनी पार पाडली. त्याचबरोबर समाजात उद्योजकता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील व्हायला हवे, भूमिपुत्रांच्या जागेवर प्रकल्प येऊन भूमिपुत्रांना त्यामध्ये नोकर्‍या आणि उद्योगांच्या संधी निर्माण व्हायला हव्यात, भागात नव्याने होणारे भूसंपादन, त्यातील धोके आणि त्यातील संधी, यासह समाजातील सांस्कृतिक गोष्टींचे जतन, ते प्रसार माध्यमांतून अनेकदा चुकीच्या पद्धतीने समाजाला प्रदर्शित करण्याचे जे प्रयत्न होतात, त्याला वेळीच आळा घालण्याचा प्रयत्न व्हायला हवा, अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@