स्थायी समितीने अंदाजपत्रकात घातली ११५ कोटींची भर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : महापालिकेचे २०१८-१९ चे आयुक्तांनी सादर केलेले अंदाजपत्रक १७८५.१४ कोटींचे होते. त्यात स्थायी समितीने ११५ कोटींची भर घालून १९००.१५ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले.
 
महासभेत सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकावर सभागृहात महसूल वाढविण्याच्या दृष्टीने येत्या काळात अनेक कठोर निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत देत आर्थिक सुधारणांवर भर देत असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. नवीन मिळकतींना दि.१ एप्रिलपासून नव्याने मालमत्ता करप्रणाली लागू करण्याबरोबरच मनपा कर्मचारी व अधिकार्‍यांच्या वेतनश्रेणीची पडताळणी करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.
 
स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके यांनी शनिवारी दि.३१ मार्च रोजी झालेल्या महासभेत १९०० कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. महासभेत बहुतांश सर्वच सदस्यांनी प्रभागातील विविध विकासकामांसाठी प्रभाग विकास निधी उपलब्ध करून द्यावा. २५७ कोटींच्या रस्त्यांची कामे तसेच यापूर्वी आयुक्तांनी रद्द केलेल्या कामांना मंजुरी देण्याची मागणी लावून धरली. दरम्यान महापालिकेचा महसूल वाढविल्याशिवाय विकासकामे कशी होणार? असा प्रश्‍न उपस्थित करत महसूल वाढीसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागले, तरी ते मी घेणारच, असे ते म्हणाले
 
@@AUTHORINFO_V1@@