शेतकरी कर्जमाफी योजनेला १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2018
Total Views |


'वन टाईम सेटलमेंट'चीही मुदत वाढवली


मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने राबवलेल्या शेतकरी कर्जमाफी अर्थात 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने'ला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून अद्यापही ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत आता १४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी याबाबत घोषणा केली तसेच, ऑनलाईन अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही देशमुख यांन केले. तसेच मुद्दल व व्याजासह दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठीही एकवेळ समझोता (वन टाईम सेंटलमेट) योजनेंतर्गतही पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरण्याचा कालावधी ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी सन्मान योजनेत आतापर्यंत ३६.९५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर १४ हजार ५६४ कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत. कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांपैकी अंतिम शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळेपर्यंत योजना कार्यरत ठेवण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, त्यानुसारच पुन्हा एकदा योजनेला मुदतवाढ मिळाली आहे.



राज्यभरात १३ लाख क्विंटलहून अधिक तूर खरेदी

राज्यात १ फेब्रुवारीपासून आधारभूत दराने तूर खरेदीला सुरुवात झाली असून आजपर्यंत १६७ तूर केंद्रावर एक लाख १६ हजार २४५ शेतकऱ्यांची १३ लाख ९९ हजार १५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असल्याची माहितीही सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. तूर खरेदीचा काळ तीन महिने असून आतापर्यंत ४ लाख ३ हजार ३७६ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केली आहे. सध्या कार्यरत खरेदी केंद्रांशिवायही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@