दुसऱ्या टप्प्यांतील पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांचे वितरण
 

नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये गणल्या जाणाऱ्या दुसऱ्या टप्प्यांतील पद्म पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि केंद्र सरकारमधील विविध मंत्री तसेच विरोधी पक्षातील नेतेमंडळीही उपस्थित होते.
 
 
 
  
 
भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याला आज पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी त्याची पत्नी साक्षी धोनी ही देखील यावेळी उपस्थित होती. तर स्नूकर खेळाडू पंकज आडवाणी याला देखील पद्मभूषण पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले आहे. अभिनेते मनोज जोशी यांना देखील आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
 
 
 
 
 
संगीत आणि कला क्षेत्रात डॉक्टर शारदा सिन्हा आणि चित्रकार लक्ष्मण पै यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. सार्वजनिक व्यवहारांकरिता अलेक्झांडर कडकिन यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. कला क्षेत्रात सिसीर पुरुषोत्तम मिश्रा यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.
 
 
 
 
 
यंदा राज्यांकडून अथवा राज्यपालांकडून शिफारस करण्यात आलेल्या एकाही व्यक्तीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली नाही. पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी यंदा केंद्र सरकारने १० सदस्यांची एक समिती नेमली होती. या समितीच्या माध्यमातूनच समाजाला माहित नसणारे, परंतु समाजसेवेचे अखंड व्रत अचारणाऱ्या मान्यवरांची यासाठी निवड करण्यात आली आहे. 
 
 

 
या पुरस्कारांमध्ये ३ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ७२ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश करण्यात आला होता. या पुरस्कारांचे दोन टप्प्यांमध्ये वाटप करण्यात आले. २० मार्च २०१८ ला पहिल्या टप्प्यांतील पुरस्कार देण्यात आले होते. तर आज दुसऱ्या टप्प्यांतील पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. यात एकूण ८४ मान्यवरांचा गौरव राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आला आहे. 
@@AUTHORINFO_V1@@