राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांना खडसेंकडूनच पूर्णविराम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2018
Total Views |




अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना खुद्द एकनाथ खडसे यांनीच सोमवारी पूर्णविराम दिला. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ही केवळ अफवा असून त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन खडसे यांनी ट्विटरवरून केले आहे.

खडसे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उंदीर घोटाळा आणि अन्य मुद्द्यांवर आपल्याच पक्षातील सदस्यांना फैलावर घेतले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खडसे यांच्या झालेल्या भेटीनंतर त्यांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. नुकतेच ते आपल्या २१ आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संदेश व्हायरल करण्यात आले होते. त्यानंतर खडसे यांनी ही केवळ अफवा असून विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या तसेच अन्य काही खोट्या अकाऊंटमधून हे संदेश पाठवण्यात आल्याची माहिती ट्विटरवरून दिली. तसेच आपण भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून आपली बदनामी करण्यासाठी वारंवार हे प्रयत्न केले जात असल्याचे खडसे यांनी सांगितले. तसेच ज्य खात्यावरून तो संदेश फिरवण्यात आला आहे त्या खात्याची चौकशी करून सायबर गुन्ह्याअंतर्गत तक्रार नोंदवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपले फेसबुकवर केवळ एकच खाते असून कोणत्याही कार्यकर्त्याने आपले अन्य खाते उघडू नये, तसेच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलव्यतिरिक्त आपण कोणत्याही ठिकाणी आपली भूमिका मांडत ऩसल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. तसेच असा प्रकार पुन्हा आढळल्यास संबंधितांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला.


@@AUTHORINFO_V1@@