ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Apr-2018
Total Views |

 
पुणे :  ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे काल रात्री निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. भाई वैद्य यांच्या निधनाने पुरोगामी वर्तुळात शोककळा पसरली आहे.
 
 
 
 
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दु:ख व्यक्त करत, " भाई वैद्य यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे, माझ्या भावना भाई वैद्य यांच्या परिवारासोबत आहेत."  अशा भावना व्यक्त केल्या आहेत. 
 
भाई वैद्य यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पूना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले, त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच त्यांचे शरीर उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

भाई वैद्य हे सामाजिक चळवळींमध्ये सक्रीय होते. गोवा मु्क्ति आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील ते सक्रीय होते. भाई वैद्य यांच्या पार्थिवावर आज सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@