कठोर मेहनत, प्रामाणिकता हाच माझा विश्वास : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
लंडन : कठोर मेहनत, प्रामाणिकता आणि देशातील नागरिकांचे प्रेम हाच माझा विश्वास आहे असे भावनात्मक मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. काल लंडन येथे ‘भारत की बात सबके साथ’ या कार्यक्रमाला संबोधित करतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले. नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात आपल्या मनातील भावना जनतेपर्यंत पोहोचविल्या यात ते म्हणतात, माझ्या देशातील नागरिक कठोर मेहनत घेण्यासाठी तयार आहेत मात्र त्यांना संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आम्ही सध्या त्यासाठीच प्रयत्न करीत आहोत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
 
 
 
 
स्पष्ट धोरण, प्रामाणिकता आणि चांगले हेतू यामुळेच तुम्ही देशात क्रांती घडवून आणू शकता.
 
 
 
 
 
नागरिकांचा माझ्यावर विश्वास आहे कारण, त्यांना माहित आहे की आम्ही करून दाखविणार.
 
 
 
 
मुलांसाठी शिक्षण, युवकांसाठी रोजगार आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी उत्कृष्ट आरोग्य सेवा या तीन बाबींबर आम्ही सध्या विशेष लक्ष केंद्रित करीत आहोत. सगळ्यांना समान संधी निर्माण व्हाव्यात अश्याप्रकारचे ‘इको सिस्टिम’ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आज आपण सगळे कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) च्या जगात वावरत आहोत त्यामुळे आपण सगळे तंत्रज्ञानापासून अलिप्त राहू शकत नाही असेही ते यावेळी म्हणाले. 
 
 
 
 
 
यावेळी नरेंद्र मोदी यांनी भगवान बसवेश्वर यांच्या जीवनावर देखील प्रकाश टाकला. लोकशाही, सामाजिक जागरूकता आणि महिला सशक्तीकरण यासाठी भगवान बसवेश्वर यांनी आपले जीवन वाहून घेतले होते. भगवान बसवेश्वर यांनी समाजाला जोडण्याचे अभूतपूर्व कार्य केले असेही ते यावेळी म्हणाले. इतिहासामध्ये माझे नाव अंकित व्हावे असे माझे लक्ष्य नाही, मात्र देशाचा विकास व्हावा हे माझे मुख्य लक्ष्य आहे असेही ते यावेळी म्हणाले. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@