नरेंद्र मोदी आज राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या सम्मेलनात भाग घेणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लंडनमध्ये राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या सम्मेलनात भाग घेणार आहेत. या सम्मेलनात ५० पेक्षा जास्त देश सहभागी होणार असून या देशांचे प्रमुख यात भाग घेणार आहेत. नरेंद्र मोदी सध्या स्वीडनच्या दौऱ्यावर गेले आहेत या दौऱ्यात त्यांनी स्वीडनचे पंतप्रधान स्टेफान ल्योव्हेन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्यात अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
 
 
या सम्मेलनात सगळ्या राष्ट्रांच्या प्रमुखांमध्ये चर्चा होणार असून या सम्मेलनात नरेंद्र मोदी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. २०१० नंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारताला कॉमनवेल्थच्या व्यासापीठावर स्थान मिळवून दिले होते.
 
 
यामुळे भारत जागतिक स्तरावर आपले प्रबळ स्थान निर्माण करू शकेल. तसेच सुरक्षा, शिक्षण, कौशल्य विकास यामध्ये भारत आपली प्रगती करू शकेल. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@