भीमा कोरेगाव प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना जामीन मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2018
Total Views |


पुणे : भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेले समस्य हिंदू आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाने अखेरकार जामीन मंजूर केला आहे. २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच एकबोटे हे पोलीस कोठडीतून बाहेर येणार आहेत.

गेल्या जानेवारी महिन्यामध्ये भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या जमावावर काही समाजकंटकांनी दगडफेक केली होती. यानंतर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या दगडफेकीसाठी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांना जबाबदार धरले होते. आंबेडकर आणि दलित चळवळींच्या मागणीनंतर एकबोटे यांना अटक करण्यात आली होती व त्यानंतर पुणे न्यायालयाने त्यांना २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
@@AUTHORINFO_V1@@